डान्स शोला बोलावून ब्लॅकमेल करणाऱ्या गुजराती अभिनेत्रीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

गुजरातमधील अहमदाबाद येथे डान्स शो बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या गुजराती अभिनेत्रीला व तिच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. तिचे नाव संजना उर्फ संजू असून तिच्या मित्राचे नाव सैय्यद मोईन अली आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. संजनाच्या विरोधात अनेकांनी तक्रार केल्या होत्या.

संजना गुजरातमध्ये प्रसिद्ध असून ‘जानू मारी दगाबाज आणि वन्स मोर बेवफा’ या अल्बममध्ये तिने काम केले आहे. या अल्बममुळे तिची लोकप्रियताही वाढली. पण त्यानंतर तिला काम मिळेनासा झाले. तसेच तिचा पतीही बेरोजगार होता. यामुळे आपल्या लोकप्रियतेचा गैरवापर करुन लोकांकडून पैसे उकळण्यास तिने सुरूवात केली. यासाठी तिने सैय्यदबरोबर डान्स शो करण्यास सुरूवात केली. संजनाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार असल्याने तिचे चाहते डान्स शोमध्ये मोठ्या संख्येने येत. याचाच गैरफायदा घेत संजना त्यांच्याबरोबर अंगलट करायची. तर तिचा मित्र त्याचे फोटो काढायचा. नंतर तेच फोटो दाखवून संजना व सैय्यद समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायला लागले. त्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून संजना गायब होती. पण अखेर पोलिसांनी तिला शोधून काढले व अटक केली आहे.