
गुजरात विधानसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला असून, आता हिंसक वळण लागत आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सुरतमध्ये रोड शो झाला. यावेळी त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. भाजपच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
सुरतमध्ये सोमवारी केजरीवाल यांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. कपडा, हिरे व्यापाऱयांशी केजरीवाल यांनी संवाद साधला. व्यापारी मोठय़ा संख्येने रोड शोमध्ये सहभागी झाले होते. रोड शो सुरू असतानाच केजरीवाल यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. सुदैवाने केजरीवाल यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. त्यानंतर रोड शो पूर्ण झाला. दरम्यान ही दगडफेक भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप ‘आप’चे उमेदवार अल्पेश कथारिया यांनी केला आहे.
…तर दगड फेकण्याची वेळ भाजपवर आली नसती !
गुजरातमध्ये भाजप 27 वर्षे सत्तेवर आहे. मात्र, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. 27 वर्षात काम केले असते तर भाजपला आमच्यावर दगडं फेकण्याची वेळ आली नसती, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते (भाजप) माझा डोळा पह्डतील; पण मी चुकीचे काहीच केले नाही. शाळा, हॉस्पिटल उभारले. भाजपने केलेले काम मला दाखवा, असे त्यांनी सांगितले.

























































