गुजरातमध्ये आढळले कोरोनाचे 11 रुग्ण, रुग्णांची संख्या पोहोचली 29 वर

574
फाईल फोटो

गुजरातमध्ये कोरोनाचे 11 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. 11 रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. यातील पाच रुग्णांना स्थानिक रुग्णाच्या प्रादुर्भावामुळे कोरोना झाला आहे. तर सहा रुग्ण हे सौदी अरेबिया, फ्रान्स, श्रीलंका आणि इंग्लडहून आले होते.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये 13, वडोदरात 6, सूरत आणि गांधीनगरमध्ये प्रत्येकी 4 तर राजकोट आणि कच्छमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सूरतमध्ये 67 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा रुग्ण दुसर्या‍ राज्याचा असून त्याला अनेक आजारांनी ग्रासले होते.

देशात संक्रमित रुग्णांची संख्या वाढली
तर दुसरीकडे देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 41 परदेशी नागरिक असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. विषाणूचा प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर फिलीपाईन्सच्या 68 वर्षाचा रुग्ण बरा झाला होता. तरी मुंबईच्या एका इस्पितळात त्याचा मृत्यू झाला.

31 मार्च पर्यंत देशाच्या 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केला आहे. अनेक लोकांना या लॉकडाऊन गांभीर्याने न घेतल्याने पंतप्रधान मोदींनी नाराजी दर्शवली होती. अजूनही लोक लॉकडाऊनला लोक गांभीर्याने घेत नाहीत. स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी सूंचनाचे पालन करा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या