हिंदुस्थानात राहायचे नसेल तर पाकिस्तानात जा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। गुरुग्राम

ऐन निवडणुकीच्या काळात मॉब लिंचिंगचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून साध्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून जमावाने घरात घुसून ‘देशात राहायचे नसेल तर पाकिस्तानात जा’ असे म्हणत मुस्लिम कुटुंबातील एकाच घरातील 12 जणांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हरयाणा राज्यातील गुरुग्राम या शहरात घडला आहे.

क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादानंतर गावातील 20-25 जणांनी भोंडसी परिसरात राहणाऱया मोहम्मद दिलशाद याच्या घरात शिरून त्याला व त्याच्या कुटुंबीयांना काठय़ांनी तसेच हॉकी स्टीक आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरुकारी दुपारी दिलशान आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जवळच्या मैदानावर गेला असता तेथे गावातील 8-9 तरुण बाईकवरून मैदानात आले आणि ‘तुम्ही लोक इथे काय करत आहात? तुम्ही पाकिस्तानात जा’ असे म्हणत ते दिलशाद आणि त्याच्या मित्रांना दमदाटी करीत मैदानातून बाहेर हाकलून देऊ लागले. त्यानंतर सायंकाळी 20-25 जणांनी दिलशादच्या घरावर दगडफेक केली.