
मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लश्कर-ए-तोयबचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानच्या एक न्यायालयाने दहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दोन अतिरेकी कारवायांप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान याआधी फेब्रुवारीमध्येही एका न्यायालयाने हाफिज सईदला अकरा वर्षाची शिक्षा सुनावली होती.





























































