सुस्थितीतील शौचालये म्हाडाने पालिकेकडे हस्तांतरित करावीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-vidhansabha

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत म्हाडामार्फत बांधण्यात आलेली सुस्थितीत असलेली शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावीत. या शौचालयांना महापालिकेने पाणी व वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. भांडुपमधील पिंपळेश्वर कॉलनीतील सार्वजनिक शौचालय खचून दोन जणांचा मृत्यू झाल्याबाबत शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. म्हाडा व मुंबई महापालिकेमार्फत १९८० पासून बांधण्यात आलेल्या शौचालयांपैकी ८० हजार शौचालये धोकादायक झाली आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर दुरुस्तीची आवश्यकता असणाऱया शौचालयांची म्हाडाने स्वतःच्या खर्चातून दुरुस्त करून पालिकेकडे हस्तांतरित करावी. त्यानंतर पालिकेने या शौचालयांची देखभाल स्वयंसेवी संस्थांमार्फत करावी असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.