
अमेरिकेच्या हिंडनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. हिंदुस्थानच्या आयुर्विमा महामंडळाने (LIC) सोमवारी सांगितले की ते अदानी समूहाच्या व्यवस्थापनाशी काही दिवसांत बोलतील.
एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार म्हणाले, ‘सध्या अशी परिस्थिती उद्भवत आहे आणि वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला निश्चित माहित नाही… आम्ही मोठे गुंतवणूकदार असल्याने आम्हाला या संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि आम्ही निश्चितपणे त्यांच्याशी संवाद साधू’, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांनी रॉयटर्स सांगितले.


























































