पित्ताचा त्रास होतोय? मग करा हे घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप यांमुळे अनेकांना अपचन किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. आज आपण यावरीलच घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

पित्तावर घरगुती उपाय

  • पित्त झाले असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
  • सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने पित्त कमी होते.
  • खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही पित्तापासून आराम मिळतो.
  • नेहमी पित्ताचा त्रास होण्यार्‍या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.
  • रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून प्यावी, पित्त कमी होते.
  • नियमित तुळशीचे सेवन पित्त मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
  • जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते.
  • तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.
  • मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.
  • पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये दूध थंड करा, प्या, उलटया त्वरीत थांबतात.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना निकिता यांनी ही माहिती दिली.