घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

शरीराला घाम येणे ही चांगली गोष्ट आहे. जास्त प्रमाणात शरीराला घाम येण्यासाठी अनेक जण जास्त प्रमाणात व्यायाम करतात. व्यायाम केल्याने जसे शरीर हलके होते. तसेच अंगातून घाम येणे सुद्धा शरीरासाठी लाभकारक आहे. शरीरातील विषद्रव, अतिरिक्त चरबी बाहेर काढणे जास्त आवश्यक असते. त्यामुळे घाम निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळा घामाची दुर्गंधी येते. ही सर्वात मोठी सतावणारी गोष्ट आहे. घामामुळे शरीरातून दुर्गंध येणं अपेक्षित आहे, पण असे सतत होत असेल तर तुम्हाला आणि इतरांना त्रासदायी ठरू शकतं. शरीरामध्ये घामाचं प्रमाण वाढलं की, दुर्गंधीचं प्रमाण वाढतं. आज आम्ही तुम्हाला घामाची दुर्गंधी घावण्यासाठीचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

दुर्गंधी घावण्यासाठीचे ‘हे’ आहेत 10 घरगुती उपाय

1. मोठ्या प्रमाणात घाम येत असेल तर स्वच्छ अंघोळ करणे जास्त महत्वाचे आहे. जर शक्य असेल तर कमीतकमी दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये लिंबाच्या पानाचा वापर केला, तर शरीराचा येणारा घामाचा वास कमी होतो.

2. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प असेल तर अनेक वेळा वारंवार घाम येतो, त्यामुळे अंग व्यवस्थित कोरडे करा.

3. घामाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच घामापासून येणाऱ्या दुर्गंधीचे प्रमाण कमी करण्यासाठी बाजारात अनेक वेगवगेळ्या वासाचे साबण मिळतात, त्यांचा वापर केला तरी खूप फरक पडतो.

4. शरीराची स्वच्छता राखणे हे घामापासून बचाव करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर नको असलेले केस काढून टाकणे जास्त फायदेशीर असणार आहे.

5. पुदिनाच्या तेलाने अंघोळ केल्याने सुद्धा शरीरातील दुर्गंधी नष्ट होते.

6. दिवसभर पायात घट्ट चप्पल घातल्याने सुद्धा अनेक वेळा पायाला दुर्गंधी येते, त्यामुळे घट्ट चप्पल, सॅंडल, बूट घालणे टाळा.

7. बाजारात अनेक वेगवेगळे वासाचे तेल उपलब्ध असतात. त्याचा वापर केल्याने सुद्धा घामाचा मोठ्या प्रमाणात वास येत नाही.

8. नेहमी स्वच्छ धुतलेली कपडे वापर.

9. रात्री झोपताना वापराच्या बुटामध्ये बेकिंग सोडा टाकून ठेवल्यानंतर सुद्धा बुटांना घामाचा वास येत नाही.

10. आहारात जास्त तिखट, मसालेदार पदार्थ आणि कॅफिन असलेले पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीला घाम जास्त येतो. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी करावे. (कॅफिन म्हणजे द्रव्य असलेले पदार्थ उदा. कॉफी)

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या