तांदळाच्या कोंड्याच्या तेलाचे फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे तेल तांदळाच्या कोंड्यापासून काढले जाते. आधी तांदळाच्या कोंड्याचा वापर हा जनावरांना खायला देण्यासाठी होत असे, परंतु जेव्हा पासून या Rice bran oil benefits लोकांना माहीत झाले आहेत तेव्हापासून  या तेलाचा वापर वाढला आहे. मार्केटमध्ये तेलाचे खूप प्रकार उपलब्ध आहेत. बदाम तेल, तीळ तेल, सूर्यफूल तेल या सर्व तेलांचा आपला एक वेगळा स्वाद आहे,आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

येथे आपण राईस ब्रान तेलापासून होणारे फायदे, त्यातील पौष्टिक तत्व  याबद्दल माहिती घेणार आहोत.

हे तेल शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. आहारतज्ञ उच्च रक्तदाबाच्या रूग्णाला Rice bran oil खाण्याचा सल्ला देतात. राईस ब्रान तेल आशियामध्ये सर्वात जास्त जापान आणि चीनमध्ये वापरले जात आहे. कारण या देशात तांदळाचा वापर जास्त केला जातो. आणि त्यांचे  तांदूळ हे प्रमुख अन्न आहे. याच्या आरोग्यदायी लाभामुळे व कमी किमतीमुळे जगातल्या बाकी देशातही याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चांगले तेल आपल्या आहारामध्ये असणे  स्वस्थ आणि निरोगी आयुष्यासाठी खूप गरजेचे आहे.

राइस ब्रान ऑइलचे फायदे

1) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत असाल तर राइस ब्रान ऑइल हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या Diet Plan मध्ये जे खात आहात. ते या तेलापासून तयार करा. राइस ब्रान ऑइल हे चयापचय सुरळीत ठेवण्यात मदत करतो. ज्यामुळे तुमचा फॅट कमी होण्यास मदत होते.

2) व्हिटॅमिन इ हे शरीरासाठी फायदेशीर
व्हिटॅमिन इ हे एक अँटीऑक्सिडेंट आहे. जे मोठ्या-मोठ्या आजारांपासून तुमचा बचाव करते. व्हिटॅमिन इ ला रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. व्हिटॅमिन इ योग्य प्रकारे घेतल्यास अनेक विकारांपासून तुमचे संरक्षण होते.

3) कॅन्सर होण्यापासून वाचवतो
राइस ब्रान ऑइलमध्ये टोकॅफेरोल्स आणि टॉकटरिनोल्स नावाचे दोन घटक आहेत. जे फ्री रेडिकल्सपासून होणाऱ्या कॅन्सरला रोखण्यास मदत करतात. जर तुम्हाला कॅन्सर सांगितला असेल तर हे तेल तुम्ही वापरू शकता.

4) मधुमेहामध्ये तेलाचे फायदे
ज्यांना मधुमेह आहे. त्यांना राइस ब्रान ऑइलचे फायदे मिळतात. मधुमेहामध्ये राइस ब्रान ऑइल खाल्यामुळे 30℅ रक्तातील ग्लुकोज कमी होते जे मधुमेही रुग्णांसाठी चांगलं आहे.

5) केसांच्या आरोग्यासाठी फायदे
राइस ब्रान ऑइलमध्ये असलेले फेरीलीक ऍसिड आणि एस्टर जे केसांच्या विकासात मदत करतात. या तेलात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन इ हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत. जे केसांना वाढण्यास मदत करते. शिवाय यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड असते. जे अवेळी पांढरे होणारे केस रोखण्यासाठी मदत करते.

6) निरोगी त्वचेसाठी फायदेशीर
तांदूळ कोंड्याचे  हे तेल त्वचेसाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. तुम्हाला जर त्वचेसंबंधी कोणती ऍलर्जी असेल, तर हे तेल तुम्ही थेट त्वचेवर लावू शकता. यामुळे तुमची ऍलर्जी कमी होण्यास थोडी मदत मिळते. ऍलर्जी जास्त असेल तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

7) हृदयासाठी फायदेशीर
या तेलामध्ये Oryzanol हा घटक असतो. यामुळेच मुख्य राइस ब्रान ऑइलचे फायदे आहेत. हे तेल तुम्ही जर प्रमाणात खात असाल, तर तुमची कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आणि तुमचे हृदय स्वस्थ राहते.