चंद्रपूरला पावसाने झोडपले; रस्त्यावर साचले पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र आहे. रस्ते गुडघ्यापर्यंत तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. अनेक वाहने थांबली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत होता.

रविवारी चंद्रपुरला पावसाने झाडपले. त्यामुळे चंद्रपूरच्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नाल्यांमध्ये पाणी साचल्याने पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पावसाने चंद्रपूर महानगरपालिकेच्या व्यवस्थेची पोलखोल झाली. जूनपासून आतापर्यंत चंद्रपुरात 102 टक्के पावसाची नोंद झाली. लोकांना चार वेळा पुराचा सामना करावा लागला. जुलै महिन्यातही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.