मुसळधार! कुरारमध्ये दरड कोसळल्याने 350 जणांचे स्थलांतर, चाळीसगावही पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह संपूर्ण राज्यातच दमदार हजेरी लावली आहे. यामध्ये जळगावच्या चाळीसगावमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात पाच नागरिकांसह 800 जनावरे वाहून गेली आहेत. नगर-धुळे महामार्गावर कन्नड चाळीसगाव घाटात गाडय़ांवर दरड कोसळल्याने अनेक गाडय़ा ढिगाऱयाखाली सापडल्या. मुंबईत कुरार, मालाड येथे दरड कोसळल्याने 350 जणांना जवळच्याच पारेखनगर पालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

राज्यात अजून तीन दिवस विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाल्याचे हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले. हवामान खात्याने उद्यासाठी रायगडमध्ये सावधगिरीचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.