अर्ध्या महाराष्ट्रात पावसाचे तुफानी थैमान; नाशिक, कोल्हापुरात अनेक नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रात आज पावसाने तुफानी थैमान घातले. कोकणसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भाला सोसाटय़ाच्या वाऱयासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले.

नाशिक आणि कोल्हापुरात सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नागपुरात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मायलेकीचा मृत्यू झाला तर नाशकात पुराच्या पाण्यात एक वृद्ध व्यक्ती वाहून गेला. राज्यात 21 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे.