शुक्रवारपासून हेल्मेटसक्ती; मागे बसलेल्याच्या डोक्यावरही शिरस्त्राण हवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारसायकलच्या मागे बसणाऱया सहप्रवाशालादेखील आता हेल्मेट घालणे सक्तीचे असणार आहे. त्याची अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱया चालकांकडून पोलीस दंड आकारणार आहेत.

हेल्मेटसक्तीबाबत गेल्या महिन्यात पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. त्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत 9 जूनला संपत आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अमंलबजावणी करणार आहोत. जे चालक नियमाचे उल्लंघन करतील त्यांचे परवाने निलंबित होतील, असे  एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.