अणाव – पालववाडीत अज्ञात रोगाने १८५ कोंबड्या दगावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

अणाव – पालववाडी येथे अज्ञात रोगाने सुमारे १८५ कोंबड्या दगावल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

येथील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून घरगुती कुक्कुटपालन व्यवसाय करतात. हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहीले जाते. या रोगात शशिकांत पालव यांच्या १५ कोंबड्या, गोपाळ पालव यांच्या १२, सुहास पालव १०, शालन पालव २, राजश्री पालव १५, बाबुराव पालव १३, मोहन सुपल १०, चंद्रशेखर सुपल १०, आनंद सुपल ८, विमल परब १०, जनार्दन सावंत २५, श्रीकृष्ण सुपल ५, रमेश पालव ८, बाळकृष्ण पालव १०, नारायण पालव ५, अनिल पालव १५, वनिता सुपल यांच्या ५ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. या बाबत कसालचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भिसे यांना माहीती देताच त्यांनी तातडीने पालववाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्झीसायक्लीन पावडरचे वितरण केले. या रोगात कोंबड्या विचित्र आवाज करतात. त्यांच्या चोचीतून लाळ गळते व त्यात त्यांचा तडफडून मृत्यू होतो. दरम्यान पशुविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांनी केली आहे.