
हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या व सरकारविरोधात घोषणा देणाऱ्या भाजपच्या 15 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबीत केले आहे. दरम्यान भाजपने राज्यपालांची भेट घेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू व्हायला अवघी काही मिनिटं बाकी असतानाच या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंग पाथानिया यांच्या चेंबरसमोर घोषणाबाजी करत होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आमदारा जयराम ठाकूर, विपीन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंदर कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंदर शोरी, दीप राज, पुरण ठाकूर, इंदर सिंग गांधी, दिलीप ठाकूर यांना निलंबीत केले.
राज्यसभा निवडणूकीत भाजपचा घोडेबाजार
मंगळवारी हिमाचल प्रदेशमध्ये पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत सत्ताधारी काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपसाठी क्रॉस व्होटिंग केले. राजिंदर राणा, सुधीर शर्मा, चैतन्य शर्मा, इंदर दत्त लखनपाल, दविंदर कुमार भुट्टो आणि रवी ठाकूर या सहा काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला आहे.






















































