हिंगणघाट जळीतकांड – दोषी विक्की नगराळेला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी वर्धा येथील न्यायालयाने दोषी विक्की नगराळेला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी याबाबत माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्यात आलं होतं. 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी सवा सातच्या सुमाराला हिंगणघाट येथील नंदोरी मार्गावर पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्यात आलं होतं. या घटनेत 40 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा 10 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.