एक लाख रुपये किलोने विकली जातेय भाजी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाज्यांचे दर वाढले की सर्वसामान्यांच्या ताटातून भाज्या गायब होतात. आपल्याकडे भाज्यांचा दर फार तर 100 ते 150 रुपये किलोच्या आसपास असतो. मात्र एक भाजी अशी आहे, जिचा दर तब्बल एक लाख रुपये प्रति किलो असा आहे. या भाजीचं नाव आहे ‘हॉप-शूट्स’ असे असून हिंदुस्थानात ही भाजी पिकवली जाते.

‘हॉप-शूट्स’चा उपयोग औषधांमध्ये केला जातो. मात्र आता हॉप-शूट्सचा वापर भाजी म्हणूनही होतो. असं मानलं जातंय की, या भाजीचा उपयोग शरीरातील कॅन्सर सेल्स मारण्यासाठी होतो. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी भाजी समजली जाते. हॉप शूट्सच्या फूलांना हॉप कोन्स असे म्हणतात. या फुलांचा वापर बियर बनवण्यासाठी करतात. हॉप-शूट्स या भाजीची आता चर्चा होतेय कारण, ही जगातील सर्वात महागडी भाजी चक्क हिंदुस्थानात पिकवली जातेय. बिहार राज्यातील अमरेश सिंह नावाचा शेतकरी या भाजीची शेती करतोय. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेतकऱयाचे आणि भाजीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर नेटिजन्समध्ये हॉप-शूट्सच्या शेतीबद्दल कुतुहूल निर्माण झालेय.