
हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी विनोदी पद्धतीने दाखवणाऱ्या हॉस्टेल डेझ या बेवसिरीजच्या चौथा सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 27 सप्टेंबरला चौथ्या सीझनला सुरुवात होणार आहे. आदर्श गौरव आणि अहसास चन्ना या दोघांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. चौथ्या सीझनमध्ये आकांक्षा, चिराग, रुपेश आणि त्यांची मित्रमंडळी कॉलेजच्या अंतिम वर्षात पोहोचलेली दाखवण्यात आली असून त्यांनी नोकरी मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू केलेले दाखवण्यात आले आहे. हा या सिरीजचा शेवटचा सीझन असणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अभिनव आनंद यांनी केले आहे.