हाती मशाली घेऊन शेकडो शिवसैनिक शिवतीर्थावर, शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन करत गद्दारांना ललकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी असलेली धगधगती मशाल नवा इतिहास रचणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन शिवसैनिक पुढील लढाईसाठी सज्ज होत आहेत. मुंबईतील विभाग क्रमांक 2 चे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे हेसुद्धा शेकडो शिवसैनिकांसह स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले.

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक हाती मशाल घेऊन शिवतीर्थ येथील स्मृतिस्थळावर पोहचले. सर्व शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन केले व गद्दारांना धडा शिकवण्याची शपथ घेतली. यावेळी महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा संघटक संतोष राणे, नंदू मोरे, संतोष धनावडे, रवींद्र वेदपाठक, प्रदीप ठाकूर, राजन निकम, ऍन्थोनी पॉल, चंदन शिंगरे, शंकर वुंडारे, श्याम मोरे, अनंत नागम, सचिन देसाई, सुभाष धानुका, जॉन डेव्हीड, भास्कर मोरे, मनोज मोहिते, प्रशांत कोकणे, लहू भोर, गणेश गुरव, कैलास कणसे, महेश सावंत उपस्थित होते. यानंतर विभाग क्र. 2 मध्ये येणाऱया बोरिवली, कांदिवली भागात मशाल बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शनही करण्यात येणार आहे.

मशालीच्या तेजोमय प्रकाशात महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा इतिहास शिवसैनिक रचणार आहेत आणि याच मशालीच्या धगधगत्या अग्नीने चाळीस गद्दारांच्या बुडाखाली असा जाळ पेटवणार, असा इशाराच सुर्वे यांनी यावेळी दिला.