Hyderabad Encouter- आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया

1339

हैदराबामध्ये डॉक्टरच्या बलात्कार, खून प्रकरणी अटक केलेल्या 4 आरोपींचा पोलिसांनी Encounter केला. या नराधमांना एन्काऊंन्टरमध्ये संपवणाऱ्या पोलिसांचे पीडितेच्या वडिलांनी आभार मानले आहेत. नराधमांना यमसदनी पाठवल्याने आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

या एन्काऊंन्टरबाबत संपूर्ण माहिती हळूहळू बाहेर यायला लागली आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी.सज्जनार यांनी या आरोपींचा खात्मा केल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. त्यांनी सांगितले की मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चन्नकेशवुलू या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंन्टरमध्ये खात्मा केला आहे. पहाटे 3 ते सकाळी 6 च्या दरम्यान हे एन्काऊन्टर झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या