
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळू लागला आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, सोनम वांगचुक यांना आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रीती झिंटाने पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
X वर एक पोस्ट करत प्रीती झिंटा म्हणाली आहे की, “मला आशा आहे की, आपले सरकार सोनम वांगचुक आणि विद्यार्थी संघटनांसोबत लवकरात लवकर एक अर्थपूर्ण चर्चा सुरू करेल, जेणेकरून वांगचुक यांची प्रकृती आणखी बिघडणार नाही. सोनम कृपया तुम्ही तुमचे उपोषण मागे घ्या. या लढ्याइतकीच तुमची प्रकृतीही महत्त्वाची आहे. तुम्ही आणि हे विद्यार्थी हिंदुस्थानच्या आणि आपल्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहात.”
आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या या लढ्यात प्रत्येक विद्यार्थ्याला आणि सोनम वांगचुक यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही तिने म्हटले आहे.
I hope our govt starts a meaningful dialogue with Sonam Wangchuk and the student bodies so his health does not deteriorate any further ! Please end your fast Sonam. Your health is as important as this fight. You and the students are fighting for the future of India and for our…
— Preity G Zinta (@realpreityzinta) July 21, 2026





























































