डॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार

प्रत्येकाची इच्छा असते की, त्याला नोकरीत करत असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त पगार मिळावा. यासाठी कोणी डॉक्टर बनणाऱ्यांची तयारी करतो, तर कोणी इंजिनियर बनण्याची. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे काही ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड आहेत ज्यांचे मासिक वेतन डॉक्टर आणि इंजिनियरपेक्षाही अनेक पटींनी जास्त आहे. यात अंबानीच्या ड्रायव्हरपासून ते अमिताभच्या बॉडीगार्डपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊ यांना किती पगार मिळतो.

salman-khans-bodyguard-sheras-salary-is-way-more-than-you-can-imagine-001

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आपल्या बॉडीगार्ड शेराला दरमहा 16 लाख रुपये पगार देतो. त्यानुसार शेराचा वार्षिक पगार सुमारे 2 कोटी रुपये इतका आहे.

1591307770_pic

शाहरुख खानचा बॉडीगार्ड अजय सिंह अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. शाहरुख आपल्या बॉडीगार्डला वर्षाकाठी 2.5 कोटी पगार देतो. मीडिया रिपोर्टनुसार, बॉलीवूड सेलेब्सच्या बॉडीगार्डमध्ये अजय सिंह हा सर्वात महाग बॉडीगार्ड आहे.

untitled-design_tahp

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिंदे हे अमिताभ यांच्याकडून वर्षाकाठी 1.5 कोटी रुपये पगार घेतात.

mukesh-ambani-car-driver_87136_730x419-m_156486

अंबानी कुटुंबाचे ड्रायव्हर होणे इतके सोपे नाही. अंबानींचा ड्रायव्हर होण्यासाठी अनेक परीक्षेला सामोरे जावे लागते. ड्रायव्हर निवडण्यासाठी खासगी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. या कंपन्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर ड्रायव्हरची निवड करतात. तसेच निवडलेल्या ड्रायव्हरला कंपनीकडून उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. 2017 च्या काही मीडिया रिपोर्टनुसार, या ड्रायव्हरांना दरमहा 2 लाखांपेक्षा जास्त पगार दिला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या