
जबरदस्त गोलंदाजी, कर्णधार रोहीत शर्माचे अर्धशतक याच्या जोरावर टीम इंडियाने आज त्यांचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाचा पाकिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा पराभव करण्यात आला आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून अपराजीत राहण्याचा विक्रमही कायम ठेवला आहे. टीम इंडियाने सात गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे.


























































