‘आयडॉल’च्या ऑनलाइन प्रवेशांची अद्याप प्रतीक्षाच

38

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन केंद्राचे (आयडॉल) प्रवेश अद्याप सुरू झालेले नाहीत. हजारो विद्यार्थी आयडॉलच्या प्रवेश परीक्षेची प्रतिक्षा करत आहे, परंतु अद्याप विद्यापीठाने प्रवेश सुरू न केल्याने ते चिंतेत पडले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता काही दिवसांतच मिळेल असा दावा विद्यापीठाने केला होता. आयडॉलच्या वतीने आज वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली गेली. त्यामध्ये फक्त फायनान्स मॅनेजमेंट आणि ऑपरेशनल रिसर्च मॅनेजमेंटचे पदव्युत्तर डिप्लोमा प्रवेश सुरू झाल्याचे नमूद आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू करण्यासाठी यूजीसीने मुभा दिल्याने ते मंगळवारपासून सुरू करण्यात आल्याचे समजते.

हेल्पलाइनचा मुलामा

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला थेट उत्तर म्हणून 8082892988 हा हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या