असं झालं तर… पाच मिनिटांत पीएफचे बॅलन्स कळेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएफचे बॅलन्स तपासणे अनेकदा कंटाळवाणे वाटते. अधिकृत वेबसाइटवर जाऊन पासवर्ड आणि कॅप्चा भरून EPFO पासबुकद्वारे बॅलन्स चेक करावा लागतो.

अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे बॅलन्स तपासणे त्रासदायक ठरते. मात्र आता उमंग (UMANG) २ अॅपच्या मदतीने घरबसल्या पाच मिनिटांत तुम्ही पीएफचा बॅलन्स तपासू शकता.

गुगल प्ले स्टोअरवरून अॅप डाऊनलोड केल्यानंतर लॉग इन करा. अॅपच्या सर्च बारमध्ये EPFO टाकून सर्च करा. त्यात View PasWook ऑप्शनवर क्लिक करा.

View PasWook ऑप्शनमध्ये UAN नंबर प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल, तेथे UAN नंबर प्रविष्ट करून पुढील प्रक्रियेसाठी गेट OTP वर क्लिक करा.

त्यानंतर OTP प्रविष्ट करून सबमिट करताच तुमच्या खात्याचे पासबुक ओपन होईल. तुम्ही या अॅपद्वारे पासबुक पाहू आणि डाउनलोड करू शकता.