
गोव्यात रंगतदार ‘इफ्फी’ महोत्सव सुरू झाला आहे. ‘इफ्फी’तील फिल्म बाजारमध्ये ‘लेट्स मीट’ आणि ‘गुथली लाडू’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
यूवी फिल्म्सचे संस्थापक प्रदीप रंगवानी यांनी ‘लेट्स मीट’ आणि ‘गुथली लाडू’ची निर्मिती केली आहे. इशरत आर. खान दिग्दर्शित ‘गुथली लाडू’ आणि रिकी संधू दिग्दर्शित ‘लेट्स मीट’ वेगळय़ा धाटणीचे चित्रपट आहेत.
‘गुथली लाडू’मध्ये संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा एका गरीब मुलाच्या आयुष्याभोवती फिरते, ज्याला स्वतःला शिकायचे आहे, पण त्याचा मार्ग अडचणींनी भरलेला आहे. हा चित्रपट ‘कान्स फेस्टिव्हल’मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘गुथली लाडू’ने 51 पुरस्कार जिंकले आहेत. तनुज विरवानी यांची भूमिका असलेला ‘लेट्स मीट’ आजच्या काळातील प्रेमसंबंधावर भाष्य करतो.



























































