मी ज्येष्ठ नेता; हात जोडून मतांसाठी दारोदार फिरू का? – कैलाश विजयवर्गीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाचे महासचिव आणि ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय उमेदवारांच्या यादीत नाव आल्याने नाराज आहेत. निवडणूक लढण्यासाठी आपली एका टक्क्याचीही योग्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपण एक ज्येष्ठ नेता असून आता मतदारांच्या घरोघरी जाऊन हात जोडून मते मागू का, असा सवालही केला आहे.

समर्थकांच्या एका कार्यक्रमात विजयवर्गीय यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली. प्रचारात मी केवळ बोलून मोकळा होणार आणि निघून जाणार हाच माझा या वेळचा प्लॅन असल्याचेही विजयवर्गीय म्हणाले.