
तेलंगणातील रंगारेड्डी जिह्यात जामिनावर बाहेर आलेल्या एका पोक्सोतील आरोपीने सहा जणांचा खून केला. राजपुमार असे त्याचे नाव आहे. त्याने घरी त्याची पत्नी, 4 वर्षीय मुलगा आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या गावात जाऊन 17 वर्षीय मुलीची, तिच्या आईची आणि आजीची हत्या केली.

























































