
रेल्वे येत्या 15 जुलैला आयआरसीटीसीची नवीन बीटा वेबसाईट लाँच करणार आहे. या अपडेटेड पोर्टलमध्ये ट्रेन तिकीट बुकिंगसाठी कॅप्चा आणि पॉप-अप्सचा पर्याय काढण्यात आला आहे. या नव्या बदलामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंग आणखी सोपी होईल, तसेच वेळही कमी लागेल.
आयआरसीटीसीमध्ये चार प्रमुख बदल करण्यात आले आहेत. यामध्ये पॅप्चा कोड काढून टाकण्यात आला आहे. यापुढे स्क्रीनवर अनावश्यक पॉप-अप दिसणार नाहीत. इंटरफेस अधिक स्पष्ट झाला आहे. आता सर्व जागा एकाच स्क्रीनवर पाहता येतील.
























































