
चेंबूर आणि अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित समस्यांबाबत शिवसेनेच्या पुढाकारामुळे एम-पश्चिम विभागामध्ये महापालिका, म्हाडा, एसआरए, रेल्वे, एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसेनेने स्थानिक नागरिकांचे प्रश्न, पायाभूत सुविधा आणि विविध रखडलेली विकासकामे आदी समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला पालिका, रेल्वे, एमएमआरडीए, एसआरए, आणि म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, सहाय्यक आयुक्त (एम-पश्चिम) शंकर भोसले, सहाय्यक आयुक्त (एम-पूर्व) उज्ज्वल इंगोले, विधानसभा प्रमुख निधी शिंदे, नगरसेविका स्नेहल शिवकर, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, संजय नटे, निमिष भोसले, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हात्रे, अमित शिंदे, संदीप भोईर, किरण लोहार, सहसंघटक अरुण हुले, समन्वयक संदीप गुरव, सहनिरीक्षक चारुदत्त कोळी, शेखर चव्हाण, अविनाश शेवाळे, किरण म्हात्रे, गणेश पाटील, अशोक वीर, राजेश दौंडकर, उमेश करकेरा, सचिन भोसले, मनोहर नायडू, दक्षता पाताडे, दीपेश चव्हाण, वैभव जाधव, उपविभाग अधिकारी रुपेश मढवीदेखील उपस्थित होते.



























































