
तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेनेने आज जोरदार रामरक्षा आंदोलन केले. ठाणे स्टेशन येथील गावदेवी मंदिराच्याजवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात हे जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘गर्व से कहो हम हिंदू है…जय श्रीराम, जय हनुमान’ नावाच्या टोप्या आणि भगवी उपरणे परिधान करत ठाणेकर मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करतानाच शिवसैनिकांसह ठाणेकरांनी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने ठाणे दणाणून सोडले.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्याना आता चुकीला माफी नाही, असे ठणकावत तमाम शिवसैनिकांसह रामरक्षा पठण केले. या आंदोलनात शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभा संपर्पप्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रभाकर म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम ढवण, तात्या माने, समन्वयक मनोज मयेकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा-माजिवडा संपर्पप्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, रोहिदास मुंडे, ठाणे पालिकेचे नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका
अॅड. आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजेश्री सुर्वे, नंदा कोथळे, अपूर्वा तेलवणे, ऋतुजा शिंत्रे, विभागप्रमुख रमेश शिर्के, प्रशांत सातपुते, तुषार रसाळ, सचिन पाटील, ज्योती पाटील, वसंत गवाळे, सचिन चव्हाण तसेच पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
प्रत्येक रामभक्ताच्या श्रद्धेवर घातलेला घावः राजन विचारे
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातून पाठवण्यात आलेली पहिली चांदीची पवित्र वीट धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातून गेली होती. ती पवित्र वीटच चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा प्रत्येक रामभक्ताच्या श्रद्धेवर घातलेला घाव आहे, असा संताप शिवसेना नेते राजन विचारे यांनी व्यक्त केला.
…हा तर प्रभू श्रीरामांच्या संपत्तीवर डल्लाः ज्योती ठाकरे
रामाच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही. अयोध्येतील मंदिर ट्रस्टवर असलेल्या त्या कोषाध्यक्षाचे काय करणार, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे केला.


























































