
मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गणपत गायकवाडांसह तिघांना 11 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची कळव्याच्या कोठडीतून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या गोळीबार प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाने ठोठावलेली 11 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होती . या वेळी न्यायालयाने गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता 11 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

























































