टिम इंडियाची झंझावाती खेळी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभारली सर्वोच्च धावसंख्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो त्यांना महागात पडल्याचे दिसत आहे. टिम इंडियाने झंझावाती 399 धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नवीन इतिहास रचला. टीम इंडियाची ही एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे.

इंदूरमध्ये होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळी करत कांगारूंना झोडपून काढले. ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाने विजयासाठी 400 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टिम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील टिम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टिम इंडियाची सर्वोच्च धावसंख्या 383 धावा होती.

एकदिवसीय सामन्यातील ही टिम इंडियाची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये टिम इंडियाची सर्वोच्च धावसंख्या 418/ 5 आहे. शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांच्या तुफानी शतके, तर के एल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके साजरी केली. शुबमन गिलने 97 चेंडूत 104 धावा, श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा आणि कर्णधार केएल राहुलने 38 चेंडूत 52 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 37 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा 13 धावा करून नाबाद राहिला.