तुमचे आयफोन सरकार हॅक करू शकते! इंडिया आघाडीतील नेत्यांना आलेल्या ई–मेलमुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिया आघाडीतील काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांचे आयफोन हॅक होण्याची आणि त्यातील माहिती सरकारी पाठबळ असलेल्या हॅकर्सकडून चोरली जाण्याची शक्यता असल्याचा मेसेज ई-मेलद्वारे अॅपलकडून पाठवण्यात आल्यामुळे मंगळवारी राजधानीत एकच खळबळ उडाली. पेंद्र सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र जेव्हा जेव्हा अदानी प्रकरण उपस्थित केले जाते तेव्हा लगेच लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी तपास आणि हेरगिरी यंत्रणा कामाला लावून असले काहीतरी प्रकार केले जातात, असा आरोप केला आहे. दरम्यान, अॅपलने मात्र आरोपांचा इन्कार केला आहे.

– राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह त्यांचे कार्यालयीन कर्मचारी, के.सी. वेणुगोपाल, टीएस सिंघदेव, पवन खेरा, सुप्रिया श्रीनेट असे काँग्रेसचे अन्य काही नेते, तृणमूल खासदार महुआ मोईत्रा, शशी थरूर, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, प्रियंका चतुर्वेदी, राघव चढ्ढा यांना अॅपलकडून असा इशारापर ई-मेल मिळाला आहे. अनेक नेत्यांनी या ई-मेलचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

माझा फोन घेतलात तरी बेहत्तर…

अडाणींना संरक्षण देण्यासाठीच हे सारे काही सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतच मंगळवारी केला. अडाणींबद्दल बोलणारे फारच कमी लोक आहेत आणि आम्ही घाबरत नाही. तुम्हाला पाहिजे तितके पह्न टॅपिंग करा, मला पर्वा नाही. माझा पह्न घ्यायचा असेल तर तोही घ्या, मीच देतो तो तुम्हाला, असे गांधी यांनी ठणकावून सांगितले.

काय आहे या संदेशात…

“अॅलर्ट – सरकार पुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा पह्न हॅक करत आहेत. आम्हाला अशी शक्यता वाटत आहे. आम्हाला वाटतंय की, तुमच्या अॅपल आयडीशी संलग्न आयपह्न अन्यत्र बसून हॅक करण्याचे प्रयत्न सरकारकडून मदत मिळणारे हॅकर्स करत आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे करता, त्यामुळे तुमचे पह्न हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत. जर हे हल्लेखोर यशस्वी झाले, तर ते कुठेही बसून तुमच्या पह्नमधील संवेदनशील माहिती, संदेश किंवा अगदी पॅमेरा आणि मायक्रोपह्नशीही छेडछाड करू शकतात. अर्थात हेही शक्य आहे की हा अॅलर्ट चुकीचा असेल. पण तो गांभीर्याने घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे,’’ असा इशारा देणाऱया ई-मेलचा स्क्रीनशॉट शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींनी एक्सवर शेअर केला आहे.