देशात 223 रुग्ण, 24 तासांत 50 रुग्ण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला असून, 24 तासांत 50 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 223 वर गेली आहे.

  • 223 कोरोना पॉझिटीव्ह मध्ये 32 विदेशी नागरिक आहेत. यात सर्वाधिक 17 जण इटलीचे, तिघे फिलीपाईन्स, दोन ब्रिटन आणि कॅनडा, सिंगापूर आणि इंडोनेशियाचा एक नागरिक आहे.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक 52 रुग्ण आहेत. केरळात 28, उत्तर प्रदेशात 23, दिल्ली, तेलंगणा आणि राजस्थानात प्रत्येकी 17 रुग्ण आहेत. कर्नाटकात 15 तर लडाखमध्ये 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, पुडोचेरी, छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे.

रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत रेल्वे बंद

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केलेल्या जनता कर्फ्युमध्ये रेल्वेनेही सहभाग घेतला आहे. रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात देशभरातील 2400 प्रवासी रेल्वे बंद राहणार आहेत.
  • शनिवारी सायंकाळी 7 वाजता सुटलेल्या दिर्घपल्ल्याच्या गाडय़ांना निश्चित स्थानकांपर्यंत जाता येईल. मात्र, रविवारी पहाटे 4 नंतर रात्री 10 पर्यंत एकही नवीन रेल्वे सुटणार नाही.
  • रेल्वेच्या या बंदमधून मुंबई लोकल सेवा, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेला वगळले आहे. मात्र, फेऱया कमी केल्या जाणार आहेत.