
सामना प्रतिनिधी । दुबई
हिंदुस्थानी क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी चॅम्पियनशिपची गदा सलग तिसर्या वर्षी स्वतःकडे राखण्यात यश मिळविले आहे. ‘आयसीसी’च्या नियमानुसार 1 एप्रिलपर्यंत जो संघ कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असतो त्या संघाला कसोटी अजिंक्य पदाचा राजदंड देऊन गौरविण्यात येते.
कसोटी क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान असलेल्या ‘टीम इंडिया’ला मानाच्या गदेसह 10 लाख अमेरिकन डॉलर्सचे (6.92 कोटी रुपये) पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. कसोटी क्रमकारीत 116 गुणांसह हिंदुस्थानी संघ अक्कल स्थानाकर तर 108 गुणांसह न्यूझीलंड दुसर्या स्थानाकर आहे. हिंदुस्थानी संघाचे अक्कल स्थान कायम मानलेच जात होते, केन किलियम्सनच्या संघाला 2018च्या आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट या पुरस्काराने गौरकिण्यात आले. त्यांना 5 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.
“आयसीसीच्या कसोटी अजिंक्य पदाचा मानाचा राजदंड सलग तिसर्यांदा पटकावणार्या ‘टीम इंडिया’चे मनापासून अभिनंदन! विराट कोहलीने क्रिकेटच्या तीनही स्करूपात अफलातून खेळी केली आहे त्याचे किशेष कौतुक.” – मनू सव्हनी (मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीसी)
“आयसीसीची ‘नंबर वन’ची गदा सलग तिसर्या वर्षी हिंदुस्थानने पटकावने आमच्यासाठी ही भूषणावह बाब आहे. आमच्या संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. हा गौरव त्याच कामगिरीची पोचपावती आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व आम्ही जाणून आहोत. आगामी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही हिंदुस्थान चांगलीच कामगिरी करेल.” – विराट कोहली (कर्णधार, हिंदुस्थान)

























































