ब्रिटनने नाकारलेल्या इंजेक्शन सिरींजचा हिंदुस्थानात वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एनएसएच) असुरक्षित ठरवलेल्या ग्रीसबॉय एमएस १६ आणि एमएस २६ या इंजेक्शनच्या सिरींज हिंदुस्थानी रुग्णालयांत सर्रास वापरल्या जात आहेत. ब्रिटिश आरोग्य खात्याने धोकादायक ठरवलेल्या या सिरींज हिंदुस्थान , दक्षिण आफ्रिका आणि नेपाळच्या रुग्णालयांना पाठविण्यात आल्या असून अनेक रुग्णालयांनी त्यांचा वापरही केल्याचे वृत्त एका प्रमुख इंग्रजी दैनिकाने दिले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार धक्कादायक असल्याचे मत हिंदुस्थानी वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

२०१० मध्ये ब्रिटिश आरोग्य यंत्रणेने काही वैद्यकीय उपकरणांची तपासणी करीत ती वापरासाठी असुरक्षित ठरवली होती. त्यात ग्रीसबॉय एमएस १६ आणि एमएस २६ या इंजेक्शन सिरींजही वापरासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याच सिरींजचा वापर करीत हिंदुस्थानातील रुग्णालये आणि वैद्यकीय संस्था करीत असल्याचे आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.