स्पेशल ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानची 368 पदकांची लयलूट

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी यूएई अबुधाबी येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक समर गेम्समध्ये शानदार प्रदर्शन करीत पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानी खेळाडूंनी या मानाच्या स्पर्धेत 85 सुवर्ण, 154 रौप्य व 129 कास्य अशा एकूण 368 पदकांवर मोहोर उमटवत देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवला.

या स्पर्धेत हिंदुस्थानचे 284 खेळाडू सहभागी झाले होते. हिंदुस्थानने पॉवरलिफ्टिंग या खेळामध्ये 20 सुवर्ण, 33 रौप्य व 43 कास्य पदकांची कमाई केली. तसेच रोलर स्केटिंगमध्ये हिंदुस्थानला 49 पदकांवर नाव कोरता आले. यामध्ये 13 सुवर्ण, 20 रौप्य व 16 कास्य पदकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या