पूंछ भागात सीमेजवळ दिसली पाकिस्तानची लढाऊ विमाने, हवाई दल हाय अलर्टवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । जम्मू

हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या हवाई दलातील लढाऊ विमानांनी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकड्यांनी सीमेवर कुरापती सुरू केल्या असून पाकिस्तानच्या हवाई दलाची दोन लढाऊ विमाने मंगळवारी रात्री पूंछ भागातील सीमेजवळ दिसल्याचे समजते. त्यानंतर हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असावा असे देखील बोलले जात आहे.

 

मंगळवारी रात्री पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून पाकिस्तानात 10 किमी अंतरावर पाकिस्तानच्या हवाई दलाची दोन विमाने आकाशात घोंघावत होती. त्यावेळी मोठा आवाज देखील झाला. त्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.