
हिंदुस्थानी लष्कराने लडाखमध्ये आशियातील सर्वात उंच पूल उभारला आहे. चीनच्या सीमेवर लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलजवळ शोक दरिया भागात हा पूल उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लेह ते दौलत बेग ओल्डी या मार्गावर पक्का रस्ताही बनवण्यात येत आहे. रस्त्याचे वेगाने सुरू असणारे काम आणि हिंदुस्थानने आशियातील सर्वात उंच पूल उभारल्याने चीनला धडकी भरली आहे. या पूलामुळे आणि रस्त्यामुळे चीनच्या सीमेवर असणाऱ्या जवानांना युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रे सहजतेने पाहचवण्यात येणार आहेत. कर्नल चेंवाह रिनरेज या पूलाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीपूर्वी केले होते.
Raksha Mantri taking a walk on
Col Chewang Rinchen Bridge, built by BRO connecting Durbuk and Daulat Beg Oldie in eastern Ladakh. pic.twitter.com/3oqk3AhG4M— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) October 22, 2019
चीनच्या सीमेजवळ पक्का रस्ता आणि दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने लष्करी चौक्यांपर्यंत सामग्री पोहचवणे जिकिरीचे होते. या पूलामुळे आणि रस्त्यामुळे लष्करी जवानांना सहजतेने सामग्री पोहचवता येणार आहे. हिंदुस्थानी लष्कराने 16 हजार फूटांच्या उंचीवर हा पूल उभारला आहे. या पूलाची लांबी 1400 फूट आहे.सुमारे 70 टनांपर्यंतचे वजन हा पूल सजतेने पेलू शकतो. या पूलामुळे लष्कराची ताकद दुपटीने वाढणार आहे. चीनने सीमाभागात रस्त्यांचे जाळे तयार केले. रेल्वेमार्गही सुरू केले. त्याचप्रमाणे हवाई तळही उभारले. मात्र, चीनने हिंदुस्थानला रस्ते आणि पूल निमिर्तीसाठी सातत्याने विरोध केला आहे. चीनच्या विरोधाला न जुमानता लष्कराने आशियातील सर्वात उंचावरील पूल उभारला आहे. त्यामुळे आता गरज भासल्यास चीनच्या सीमेवर जवान अधिक जलदगतीने पोहचणार आहेत. त्याचप्रमाणे लष्कराचे मोठे टँक आणि युद्धसामग्रीही सहजतेने पोहचवता येणार आहे. त्यामुळे आता चीनला धडकी भरली आहे.






















































