‘इंडियन आयडॉल’ आता मराठीमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय सिंगिंग रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल’ची आतापर्यंत अनेक पर्व झाली आहे. प्रत्येक पर्वाला प्रेक्षकांची भरघोस पसंती मिळाली आहे. अनेक कलाकार या शोच्या माध्यमातून इंडस्ट्रीला मिळाले आहेत. आता हा शो मराठीतदेखील रंगणार आहे. सोनी मराठी वाहिनीने नुकताच ‘इंडियन आयडॉल मराठी’चा टीझर शेअर केला आहे. ‘इंडियन आयडॉल मराठी’मुळे राज्यातील स्पर्धकांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचा मंच मिळेल.