Indian Navy आणि DRDO ची इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, हिंदुस्थान BMD असलेल्या देशांच्या यादीत सामील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डीआरडीओ आणि नौदलाने 21 एप्रिल रोजी बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनार्‍याजवळ समुद्रावर आधारित एंडो-एटमॉस्फेरिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या चाचणीसह हिंदुस्थानने इतिहास रचला. नौदल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (BMD) क्षमता असलेल्या देशांच्या यादीमध्ये आता हिंदुस्थान सामील झाला आहे.

यापूर्वी DRDO ने जमिनीवर आधारित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे यशस्वीरित्या प्रदर्शन केले आहे. ज्यामध्ये शत्रुच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या धोक्याला कमी करण्याची क्षमता आहे.

याआधी नौदलाने अरबी समुद्रात ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या युद्धनौकेच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. यावेळी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले होते की, क्षेपणास्त्रात बसवलेले स्वदेशी बूस्टर DRDOने विकसित केले आहे. ज्यामुळे संरक्षण क्षेत्रात हिंदुस्थान स्वावलंबी बनल्याचे दर्शविते.