
इंडियन ऑइल आपल्या 13 तेल पेंद्रांमार्फत राज्याच्या इंधनाची तसेच 4 बॉटलिंग प्लांटद्वारे एलपीजीची गरज पूर्ण भागवते. तसेच इंडियन ऑइलची राज्यात 9 विमान इंधन पेंद्रे आहेत. पुरवठा पेंद्र, विमान इंधन पेंद्र आणि नवीन आऊटलेट्स अपग्रेड करण्यासाठी पुढील 3 ते 4 वर्षांत महाराष्ट्रात सुमारे 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन ऑइलची योजना आहे, अशी माहिती इंडियन ऑइलच्या महाराष्ट्र व गोवा कार्यालयप्रमुख व कार्यकारी संचालक अनिर्बन घोष यांनी दिली.
इंडियन ऑइलने 2022 हे वर्षे हरित भविष्याची जडणघडण म्हणून साजरे केले. 2023 मध्ये हरित संकल्प बळकट करण्यासाठी समर्पित असणार आहे. याचाच भाग म्हणून इंडियन ऑइलच्या संभाजीनगर येथील रिटेल आऊटलेटमध्ये एक्सट्रागीन डिझेल विक्रीचा शुभारंभ अनिर्बन घोष यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सीजीएम (एलपीजी) अनुप सामंतरे, रिटेल सेल्सचे जीएम संजय सेमवाल, संभाजीनगर येथील डिव्हिजनल रिटेल सेल्स हेड राकेशकुमार सरोज, डिव्हिजनल एलपीजी सेल्स हेड चेतन पटवारी उपस्थित होते.