
देशातील शेअर बाजारातील इक्विटी मार्केटमध्ये 27 जानेवारीपासून महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलामुळे शेअर बाजारातील सेटलमेंटला गती मिळणार आहे. 27 जानेवारीपासून बाजारात T +1 प्रणाली लागू होणार आहे. ही प्रणाली लागू केल्यामुळे व्यवहार करणाऱ्यांचे पैसे 24 तासात त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच पोर्टफोलियोमधील एखादे शेअर विकल्यावर 24 तासात त्याचे पैसे खात्यात जमा होणार आहे. सर्व लार्ज कॅप आणि ब्लू चिप कंपन्या 27 जानेवारीपासून T+1 प्रणालीवर स्विच होणार आहेत.
आता शेअर बाजारात T+ 2 प्रणाली लागू आहे. त्यामुळे व्यवहार केल्यावर खात्यात पैसे जमा होण्यासाठी 48 तास लागतात. बाजारात 2003 पासून T+2 प्रणाली सुरू आहे. आता 27 जानेवारी 2023 पासून या प्रणालीत बदल होणार आहेत. T+ 1 प्रणालीमुळे गुंतवणूकदारांना फंडची खरेदीविक्री गतीने करून जास्त ट्रेडिंग करण्याची संधी मिळणार आहे.
एखाद्या खरेदी करणाऱ्याला शेअर आणि विक्री करणाऱ्याला पैसे मिळाल्यावर व्यवहार आणि सेटलमेंट पूर्ण होते. देशात सध्या T+2 प्रणाली कार्यरत आहे. आता T+1 प्रणाली लागू झाल्यावर लिक्विडिटीमध्येही वाढ होणार आहे. या प्रणालीमुळे गुंतवणूकदारांकडे लवकर पैसे जमा होतील. त्यामुळे व्यवहार वाढतील आणि त्यामुळे बाजाराचा व्हॅलूम व लिक्विडिटीही वाढणार आहे.


























































