मलेशियात अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना हवी मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे फिलिपाइन्सला उच्च शिक्षणासाठी गेलेले अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यात अनेक मराठी मुलांचाही समावेश आहे. ही सर्व मुले मलेशियामधील कौलालंपूर विमानतळावर अडकून पडली आहेत. या मुलांची संख्या 300 च्या आसपास आहे. हिंदुस्थानात परतण्यासाठी विमान उपलब्ध नसल्याने ही सर्व मुले विमानतळावरच अडकून पडली आहेत. या सर्व मुलांसमोर मायदेशी कसे परतायचे हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत हिंदुस्थानात आणण्यासाठी मदत करावी असे साकडे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शासनाला घातले आहे. मलेशियात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असल्याने हिंदुस्थानी विद्यार्थी मोठय़ा दहशतीखाली वावरत आहेत, अशी माहिती कौलालंपूर येथे अडकलेली मराठी विद्यार्थिनी शर्वरी कुंभार हिचे वडील सुदाम कुंभार यांनी दिली आहे.