
सामना ऑनलाईन ,नवी दिल्ली
नोकरीसाठी देशाबाहेर राहून कमावलेला पैसा स्वदेशी पाठवण्यात हिंदुस्थानने बाजी मारली आहे. गेल्या वर्षभरात एनआयआरनी ६९ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४.६८ लाख कोटी रुपये हिंदुस्थानात पाठवले आहेत, वर्ल्ड बँकेने ही माहिती दिली आहे.
हिंदुस्थानात पाठवण्यात आलेल्या रकमेपैकी सर्वाधिक म्हणजे ४० टक्के रक्कम केरळमध्ये पाठवण्यात आली आहे. मायदेशी पैसे पाठवण्यात हिंदुस्थानपाठोपाठ चीन, फिलिपिन्स, मॅक्सिको, नायझेरिया आणि मिस्त्रा या देशाचा नंबर लागतो. गेल्या २६ वर्षात एनआयआरकडून स्वदेशी पाठवण्यात आलेल्या रकमेत तब्बल २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९९१ साली एनआयआरनी हिंदुस्थानात ८७०० कोटी रूपये पाठवले होते. २०१६ साली हा आकडा ४.२ लाख कोटी रूपयांवर पोहोचला. तर २०१६ च्या तुलनेत या आकडय़ात ९.५ टक्के वाढ झाली असून हा आकडा ४.६८ कोटी रूपयांवर पोहोचला.
केरळमध्ये पाठवला सर्वाधिक पैसा
परदेशातून हिंदुस्थानात पाठवण्यात आलेल्या रकमेपैकी सर्वाधिक म्हणजे ४० टक्के रक्कम केरळमध्ये पाठवण्यात आली आहे. त्याखालोखाल पंजाब (१२.७ टक्के), तामीळनाडू (१२.४ कोटी), आंध्रप्रदेश (७.७ टक्के), उत्तरप्रदेश (५.४ टक्के) या राज्यांचा समावेश आहे.
डॉलर आणि युरोला मिळालेली बळकटी, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीचा युएई, सौदी अरब, बहरीन, कुवेत, ओमन, कतार सारख्या देशांवर झालेला सकारात्मक परिणाम, अमेरिका, युरोपीयन युनियन आणि रूसी फेडरेशन सारख्या विकसित अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती ही परदेशातून हिंदुस्थानात पैसा पाठवण्यामागची मुख्य कारणे आहेत.
रोजगारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरित झालेल्यांची संख्या २६ कोटी आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ८८ टक्के युएईमध्ये आहेत. त्याखालोखाल कुवेत (८०टक्के), कतार (७९ टक्के), लिकटेंस्टीन (६८टक्के), ब्रुने दारूसलम (६५ टक्के), चीन (५७ टक्के), बहरीन आणि गुआम (५४ टक्के), सिंगापूर (४६ टक्के) आणि लग्जमबर्ग (४५ टक्के). युएसच्या तुलनेत युएईमध्ये नोकरीसाठी गेलेल्या हिंदुस्थानींची संख्या अधिक आहे. युएईमध्ये ३.३ मिलीयन हिंदुस्थानी आहेत.


























































