फिलिपाईन्समध्ये सापडले इंद्राचे वज्र, शिवाचे त्रिशूल

indras-vajra-thunderbolt-shivas-trishul-trident-found

फिलिपाईन्समध्ये दहा हजार वर्षांपूर्वींचे शिवाचे त्रिशूळ आणि तीन हजार वर्षांपूर्वींचे इंद्राचे वज्र सापडल्याचा दावा हिंदुस्थानी उद्योजक आणि संशोधक सय्यद शमीर हुसैन यांनी केला आहे.

2015 मध्ये फिलिपाईन्स येथे उत्खनन करताना हुसैन यांना हे त्रिशूल आणि वज्र सापडले होते. या वस्तूंचे महत्त्व उलगडून सांगण्यासाठी त्यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. हे खरे त्रिशूळ आणि वज्र आहे हे संशोधनात सिद्ध झाले आहे, असे मत हुसैन यांनी मांडले.

सय्यद शमीर हुसैन यांचा खाणकामाचा व्यवसाय आहे. फिलिपाईन्स येथील अनुसान डेल नोर्ते विभागातील सिरोन डोंगरावर पिरादा खाणीत 20 फूट खोलवर त्यांना या दोन वस्तू सापडल्या. त्यापैकी वज्र हे पाच धातूंचे बनलेले असून 15 बाय 14 सेंटीमीटरचे आहे आणि त्रिशूल हे कांस्याचे असून 99 बाय 17 सेंटीमीटरचे आहे. पुरातत्व विभागाशी संपर्क साधून त्यांनी त्या वस्तू नोंदणीकृत करून घेतल्या आहेत.