इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लिंगभेदावर केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.  इंदुरीकर महाराजांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका आज निकाली काढली. या निर्णयामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत.