‘टायगर’ अभी जिंदा है! नाल्यात सापडलेले अर्भक ठणठणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, उल्हासनगर

केवळ अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या अर्भकाला उल्हासनगरच्या नाल्यात फेकून त्याचा जीव घोटण्याच्या क्रूरतेला केवळ दैवी चमत्कार आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे लगाम बसला आहे. 20 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारा ‘तो’ आता ठणठणीत आहे. टायगर अभी जिंदा है… या अविर्भावात त्याने आज पहिले स्माईल दिले. त्यामुळे हॉस्पिटलमध्येच त्याचे नामकरण थाटात पार पडले आणि त्याचे नावही साजेसेच ठेवले ते म्हणजे ‘टायगर’.

… आणि ‘त्या’ बनल्या आई!
एखादे नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळल्यास त्याच्या देखभालीची सर्व जबाबदारी पोलिसांना घ्यावी लागते. त्यात महिला पोलिसांवर अधिक जबाबदारी असते. आता ही श्वेता गमरे, अनिता साळवे, रेखा मिसाळ, सुनिता सकाटे, अंजली दुधभाते, मीरा शिरसाट, प्रीती डोंगरे या महिला पोलीस ‘टायगर’ची आई बनल्या आहेत.

स्माईल प्लीज…
सरकारी रुग्णालयातील डॉ. जान्हवी भोसले, डॉ. प्रसन्नजीत जाधव यांनी बाळावर उपचार सुरू केले. बाळाची प्रकृती नाजूक होती. शर्थीचे प्रयत्न फळाला आले आणि 18 व्या दिवशी बाळाने पहिल्यांदा डोळे उघडले आणि त्याने पहिल्यांदा कॅमेऱ्याकडे पाहून चक्क स्माईल दिले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, जयश्री रगडे यांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले होते.